Site icon साप्ताहिक एकच ध्येय

साताऱ्यात फीट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : आजादी का अमृतमहोत्सव” कार्यक्रमाअंतर्गत साताऱ्यात नेहरु युवा केंद्र, एनएसएस आणि शिवाजी विद्यपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं फीट इंडिया फ्रीडम रनचं आज सकाळी सातारा इथल्या छत्रपती शाहू क्रिडा संकूल ते यशंवतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पर्यंत आयोजन केलं होतं. रोज अर्धा तास व्यायामासाठी आपल्या निरोगी आरोग्यासाठी हा संदेश या रनमधून दिला गेला. अशा उपक्रमांमधल्या सहभागामुळे देशाच्या सक्षमीकरणात मोठी मदत होईल, असं मत आयोजकांनी व्यक्त केलं. या रन मधे युवक वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता.

Exit mobile version