राज्यात काल ३ हजार ५६ रुग्ण बरे तर ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ९४ हजार २५४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख २ हजार ८१६ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार ९६ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४९ हजार ७९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ५ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. दरम्यान मुंबईत काल २३२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख ११ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ३४ हजार ७०२ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १८५ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ६६६ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा १६ हजार १५ वर पोचला आहे.