देशात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त होती. काल देशभरात २७ हजार २५४ नवे रुग्ण आढळले. तर ३७ हजार ६८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी २४ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५४ शंताश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ३ लाख ७४ हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येपैकी हे प्रमाण फक्त १ पूर्णांक १३ शतांश टक्के आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशातल्या सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा दिली आहे. दादरा-नगर हवेली, दीव-दमण, गोवा, हिमाचल प्रदेश, लदाख, लक्षद्वीप आणि सिक्कीम यांनी ही कामगिरी केली आहे. मुंबईत काल संध्याकाळपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार चोवीस तासात ३५४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १८८ रुग्ण बरे झाले. शहरात आतापर्यंत ७ लाख ११ हजार ७४२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के असून मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २१० दिवसांवर आला आहे.