देशात कोविड- १९चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यावर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड-१९ चे ३८ हजार ३०३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्के झाला आहे. काल ३० हजार ५७० नवे रुग्ण आ्रढळले. देशभरात सध्या सुमारे ३ लाख ४२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ७६ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल ६४ लाख ५१ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत ७६ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.