नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात केलेल्या परिस्थितीजन्य सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाविषयी ठोस माहिती मिळवणं हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता असं केंद्रिय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी सांगितलं. पंतप्रधान किसान योजनेद्वारे आतापर्यंत थेट लाभ हस्तांतरणातून ११ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १ लाख ५८ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.