साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात निर्यात केलेल्या साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला असून लवकरच ही रक्कम संबंधित कारखान्यांना मिळणार आहे. या हंगामात एकंदर ६० लाख टन साखर निर्यात झाली होती आणि त्यापोटी एकंदर ३५०० कोटी रुपयांचं अनुदान केंद्राकडून मिळणार होतं. त्यापैकी १८०० कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली असून उर्वरित रक्कमही पुढील महिना अखेरपर्यंत देण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरु असल्याचं साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितलं. अनुदानाच्या या रकमेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची थकबाकी देणं कारखान्यांना शक्य होणार आहे. त्याचबरोबर नव्या हंगामात साखर निर्यातीलाही चालना मिळणार आहे.