इतर देशांना देणगी स्वरुपात देण्यासाठी लसींच्या ५०० दशलक्ष मात्रा खरेदी करण्याचं अमेरिकेचं आश्वासन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं कोविड-प्रतिबंधक लसींच्या ५०० दशलक्ष अतिरिक्त मात्रा इतर देशांना देणगी स्वरुपात देण्यासाठी खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोविड आपत्तीला केवळ अमेरिकेतूनच नव्हे, तर जगभरातून हद्दपार करायचं आहे. या मोहिमेचं आपलं नेतृत्व आपल्या कृतीतून सिद्ध करण्यासाठी अमेरिकेनं हा निर्णय घेतल्याचं राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या काल झालेल्या कोविड वैश्विक संमेलनात जाहीर केलं. कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांच्या प्रतिनिधींसह जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रस अधनोम घेब्रेयेसस या परिषदेला उपस्थित होते.