प्राप्तीकर विभागाने जालनातल्या एका स्टील कंपनींशी संबंधित ठिकाणी घातले छापे
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : आर्थिक व्यवहारांतल्या अनियमितते प्रकरणी प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या एका स्टील कंपनींशी संबंधित ठिकाणी छापे घातले. या कंपनीशी संबंधित जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकत्ता इथल्या ३२ हून अधिक ठिकाणी छापे घातल्याचं प्राप्तीकर विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. या छाप्यांमध्ये विभागाने बँकांमधली १२ लॉकर, २ कोटी १० लाख रुपयांची रोख रक्कम, १ कोटी ७० हजाराचे दागीने आणि बेनामी संपत्ती आणि आर्थिक अनियमीततेशी संबंधीत पुराव्यांचे दस्तऐवज जप्त केले. कपंनीशी संबधित बेनामी रक्कम ३०० कोटीपेक्षा अधिक असू शकते असंही प्राप्तीकर विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.