येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : गुलाब चक्रीवादामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे ४८ तास राज्यात राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं आज पालघर, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, या जिल्ह्यांना रेड अॅलर्ट, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.