प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत शहरी अभियानाचा दुसरा टप्पा आणि अमृत अभियान 2 ला केला प्रारंभ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घेण्यासारखी एक चळवळ आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या शहरांना कचरामुक्त करण्याच्या आणि जलसुरक्षित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अटल अमृत भाग २ योजनेचा आरंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते. देशातली शहरं कचरा मुक्त करण्यासाठी आणि पाण्यापासून संरक्षित करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन शहरी २ आणि एसबीएम यु आणि अटल मिशनची सुरुवात केली. सातत्यपूर्ण विकास कार्यक्रमाचं जे लक्ष्य २०३० पर्यंत ठेवण्यात आलं आहे ते प्राप्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढच्या शहरीकरणाचं आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यात मदत होणार आहे. आपल्या सरकारनं स्वच्छ भारत मिशनसाठी आतापर्यंत चार लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी गृहनिर्माण आणि शहर मंत्री हरदिप सिंग पुरी, जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आदी मान्यवर उपस्थित होते.