Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात आजवर ८९ कोटी २ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आजवर ८९ कोटी २ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ६४ लाख ४० हजारहून जास्त जणांना लसीची मात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात काल दिवसभरात २८ हजार जण कोरोनामुक्त झाले तर २६ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या घसरून २ लाख ७५ हजार २२४ वर पोचली आहे. मागच्या १९४ दिवसमधली ही सर्वात कमी सक्रिय रुग्ण संख्या आहे. देशात सक्रिय रुग्णांचा प्रमाण सध्या ० पूर्णांक ८२ शतांश टक्के इतकं झालं असून मागच्या मार्चपासून प्रथमच हे प्रमाण नोंदवण्यात आलं आहे.  देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ८६ शतांश झाला आहे, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान, सरकारनं कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या आयातीवरच्या सीमा शुल्क माफीला या वर्षा अखेर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Exit mobile version