देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घ्यावी अशी एक लोक चळवळ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं. स्वच्छ भारत शहरी अभियानाचा दुसरा टप्पा, अमृत अभियान 2 आणि शहर कायाकल्प आणि परिवर्तनासाठीच्या अटल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला; त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेलं योगदान अमुल्य आहे अशा शब्दात यावेळी मोदी यांनी सर्व स्वच्छता दुतांचा गौरव केला. गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदिप सिंग पुरी, जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत या कार्यक्रमाला उपस्थित होते.