विद्यार्थ्यांच्या हितासाठीच राज्यात उशिरा शाळा सुरु करण्याचा निर्णय – राजेश टोपे
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांच्या हितासाठीच राज्यात उशिरा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागासह आरोग्य विभागनं शाळा आणि महाविद्यालयांना योग्य प्रकारच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे यांच्या हस्ते आज जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसंच उपकेंद्रांना अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण केल्यानंतर ते आज बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं या गावांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.