Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी,  कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं लसीकरण ग्राह्य धरलं जाणार नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर भारतानंही इंग्लंडमधून येणाऱ्या त्यांच्या नागरिकांवर हे बंधन घालायचा निर्णय घेतला आहे. नवे नियम इंग्लंडमधून येणाऱ्या त्यांच्या सर्व नागरिकांना लागू असतील. त्यांचं लसीकरण झालेलं असो किंवा नसो, प्रवासाच्या  आणि विमानतळावर उतरण्याच्या  ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी  करणं आणि इतर नियम  त्यांना लागू राहतील. भारतात उतरल्यानंतर  दहा दिवस विलगीकरण आणि आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असणार आहे.

Exit mobile version