Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लस पुरवठा करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याच्या मोहिमेचं काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याहस्ते उद्घाटन झालं. मणिपूरमधल्या विष्णुपुर जिल्ह्यात ही मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं, म्हणजेच आयसीएमआरनं ईशान्य भारतात लस पुरवठा करण्यासाठी ही मोहीम सुरु केली आहे. काल झालेल्या चाचणीमध्ये विष्णुपुर जिल्ह्यात लौकोईपत इथून कारंग इथं यशस्वीपणे ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्यात आला.

Exit mobile version