Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजपा तर अकोल्यात वंचित बहुजनचं वर्चस्व कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता धुळ्यात भाजपानं वर्चस्व कायम राखलं आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, तर इतरत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, आणि पालघर या जिल्ह्यांमधल्या रिक्त जागांसाठी काल ही पोटनिवडणूक झाली. त्यासाठी सरासरी ६३ टक्के मतदान झालं. आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा पहिलाच निकाल भाजपाच्या बाजूनं लागला. लामकानी गटात धरती निखिल देवरे यांनी 4 हजार 296 मतांनी विजय मिळवला. धुळे जिल्हा परिषेदच्या १५ गटाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपानं ८ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ३, तर काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी २ जागांवर विजय मिळवला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व १४ जागांचे निकाल जाहिर झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीची सत्ता अबाधित असून, राष्ट्रवादी काँग्रेसला २ तर भाजपाला एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. दोन जागा अपक्षांनी जिंकल्या आहे. शिवसेना आणि प्राहार संघटना यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यात  सर्व १४ जागाचे निकाल हाती आले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं ५, काँग्रेस, भाजपा, आणि वंचित आघाडी प्रत्येकी २, तर शिवसेना आणि जनविकास आघाडी  यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांचे निकाल हाती आले असून त्यात भाजपानं ४, शिवसेना आणि काँग्रेसनं प्रत्येकी ३, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं १ जागा जिंकली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या १० जागांचे निकाल हाती आल्या आहेत. त्यात भाजपानं ४, शिवसेना ३, राष्ट्रावादी २, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं १ जागा जिंकली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ९ जगाचे निकाल जाहिर झाले आहेत. त्यात ६ जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. भाजपा, शेकाप, आणि गोंगापा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

Exit mobile version