नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक – इकबालसिंह लालपुरा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी व्यक्त केलं आहे.ते आज मुबंईत विविध धर्मियांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत बोलत होते. समान न्याय, शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीतूनच विकास साधला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.सर्वधर्मिय अल्पसंख्याक नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी अल्पसंख्याकांसाठीच्या विविध सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. धर्माचा वापर राजकारण करण्यासाठी न होता तो समाजातल्या गरजू व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हावा,असं आवाहन त्यांनी केलं.