देशात आतापर्यंत सुमारे ९५ कोटी ५० लाख लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारी अडीच वाजेपर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या एकूण ९५ कोटी ४९ लाख ८ हजार ९५ लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २६ कोटी ९५ लाख ७० हजार ६०६ जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे.लसीकरणाच्या आज २६९ व्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत देशभरात ४२ लाख ३८ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. राज्यातही आज दुपारपर्यंत एकूण ८ कोटी ८१ लाख ६० हजार ७५४ लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २ कोटी ६९ लाख ७२ हजार १५५ जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आजच्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत राज्यात ४ लाख ८७ हजार ३५५ लस मात्रा दिल्या गेल्या आहेत.