भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात उद्यापासून १५ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. या सरावाचा पहिला टप्पा २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान फिलिपाईनच्या समुद्रातपार पडला. दुसऱ्या टप्प्यातील सरावामध्ये भारतीय नौदलातर्फे एका पाणबुडीसह, आयएनएस रणविजय आणि आयएनएस सातपुडा या युद्धनौकांचा यामध्ये समावेश असेल. दोन विनाशिकांसह, युएसएस कार्ल विन्सन हे विमानवाहू जहाज अमेरिकेचे प्रतिनिधित्व करेल. जेएस कागा आणि जेएस मुरासामी या युद्धनौका जपानच्या सागरी आत्मरक्षण दलाचं प्रतिनिधित्व करतील तर रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाच्या वतीने एचएएमएस बॅलारट आणि एचएएमएस सिरीयस या युद्धनौका सहभागी होतील.