कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील विमानतळावर त्यांचे स्वागत करणेत आले. शहरातील विमान तळावर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आगमन झालेनंतर भुमीला वंदन करून वळीवडे कॅम्पच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते मुंबईमार्गे विमानाने कोल्हापुरात पोहचले. विमानतळावर करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, सचिन जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथे 1942 ते 1948 या काळात या निर्वासितांचे बालपण व्यतीत केले आहे. बालपण व्यतीत केलेले नागरिक व त्यांचे सहकारी अशा एकूण 27 नागरिक येथे दाखल झाले आहेत.
विमानतळावरून त्यांचे हॉटेल सयाजी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, याज्ञसेनी फत्तेसिंह सावंत, सुमित्रादेवी सुरेश माने, कृतिका संग्रामसिंह चव्हाण, रिमा रवींद्र पाटील यांनी कुंकुमतिलक लावून व पुष्पहार घालून स्वागत केले.
पोलंड देशाच्यावतीने उपपरराष्ट्र मंत्री प्रिझिदॅज नेतृत्वाखाली द्विस्तरीय शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री कोल्हापुरात दाखल होत आहे. दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते कोल्हापूर शहरातील उद्योजकांशी संवाद साधणार आहेत.
याकार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले २७ नागरिक व उपपरराष्ट्र व उच्चस्तरीय सदस्य वळीवडे येथे भेट देणार आहेत. वळविडे येथे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे १३ नागरिक देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. दिनांक 14 सप्टेंबर रोजी हे वळिवडे ते दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्या ठिकाणी राहत होते, तेथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 1942 ते 1947 या काळात ते पाच हजार नागरिक निर्वासित म्हणून ज्या भागात राहत होते, तेथे उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभाचे अनावरण मार्सिन प्रसिदॅज त्यांच्या हस्ते होणार आहे. याच भागात एक कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात येणार आहे. कॅप वळीवडे येथील जीवन आणि काळ यांची आत्ताच्या व पुढील पिढ्यांना माहिती व्हावी हा या संग्रहालय उभारण्याचा उद्देश आहे. या संग्रहालयात त्या काळातील छायाचित्रे, चित्रे, कागदपत्रे, आणि इतर महत्त्वाच्या वस्तू तसेच साहित्य ठेवले जाणार आहेत. येत्या वर्षभरात हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
वळीवडेतील बांगडीची ७२ वर्षांची लुथांची आठवण..!!
वळविडे येथे १९४२ ते १९४८ या कालावधीत लुथा मारिया आईसमवेत रहात असताना, आईने वळीवडे येथे कॅम्प मध्ये हातात घातलेली बांगडी पोलंडच्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. ७२ वर्षा पासून हातात असेलेली बांगडी स्टीलची असून भारतातील शाहु महाराजांच्या भुमीची आठवण जपून ठेवल्याचं लुथा मारिया यांनी सांगितले .