Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्याने कोविड प्रतिबंधक लशीच्या ९ कोटी मात्रांचा टप्पा ओंलाडला

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं ९ कोटी मात्रांचा टप्पा ओंलाडला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. राज्यात काल ६ हजार ८४८ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ७ लाख २९ हजार ५३० नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ हजार ८७० मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. यात  दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २ कोटी ७६ लाख आहे. ही संख्या देशातल्या इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं व्यास यांनी सांगितलं. राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबवलं जात आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात सर्व विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना एकत्र करुन लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.

Exit mobile version