Site icon साप्ताहिक एकच ध्येय

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी लशीच्या दोन मात्रा अत्यावश्यक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, आणि इतर पदाधिकारी, सदस्य, प्रमुख कार्यकर्ते उपस्थिती होते. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुख्य समारंभ नसला तरी तिथ जाणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दिक्षाभूमीचं मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. आज आणि उद्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेनं सर्व तयारी पूर्ण केली असून, कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका सज्ज आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनीही आपल्याकडून कुठल्याही प्रकारे नियमांचा भंग होऊ नये याची काळजी घेत, स्वत:सह इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षा बाळगावी, असं आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केलं आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गांवर पालिकेनं सहा लसीकरण केंद्रंही सुरू केली आहेत. काल महापौरांनी या लसीकरण केंद्रांचे लोकार्पण केलं. दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी लशीच्या दोन मात्रा घेणं अत्यावश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचा एक डोज घेतला आहे आणि दुसरा डोज घेण्याचा अवधी पूर्ण झालेला आहे. अशांसाठी ही व्यवस्था केली आहे. ज्या अनुयायांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी पालिकेनं चाचणीची व्यवस्था केली आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईल, त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १०० ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरती नळ व्यवस्था उभारली आहे. याशिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतीगृहाजवळच्या मोकळ्या ५०० तात्पुरती शौचालयं उभारली आहेत.

Exit mobile version