Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी

नवी दिल्ली : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू ओढवतो, तसेच माणसांवरही त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करण्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कचरावेचक महिलांसमवेत जमिनीवर बैठक मारून कचऱ्यातून प्लास्टिक बाजूला करण्याचे काम काही काळ केले. मोदी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाला २०२४ पर्यंत केंद्र सरकार १२६५२ कोटी रुपये मदत देणार आहे. यात ५०० दशलक्ष जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ३६ दशलक्ष वासरांचे लसीकरण यात केले जाणार असून त्यामुळे त्यांचे ब्रुसेलोसिस रोगापासून संरक्षण होईल. यात २०२५ पर्यंत रोगनियंत्रण व २०३० पर्यंत रोग निर्मूलन असे दोन भाग आहेत.

मोदी यांनी राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा शुभारंभ केला, त्या वेळी त्यांनी शेतक ऱ्यांशी संवाद साधला.

प्लास्टिक  कचरा वेगळा करणाऱ्या २५ कचरावेचक महिलांशी मोदी बोलले, त्यांना काही प्रश्न विचारले, या महिलांचा गौरवही करण्यात आला.  २०२२  पर्यंत एकदा वापराच्या प्लास्टिकला हद्दपार करण्याचे सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्लास्टिक गोळा करणे व त्याचा फेरवापर करणे गरजेचे आहे असे मोदी यांनी या वेळी सांगितले.

Exit mobile version