Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘मिशन कवच कुंडल’ला राज्याभरातून चांगला प्रतिसाद

मुंबई (वृत्तसंस्था) : बारामती औद्योगिक उत्पादक संघटनेच्या वतीनं उद्योजक आणि कामगार बांधवांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे त्याचा प्रारंभ काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दिवाळीपर्यंत शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश यावेळी पवार यांनी दिले. राज्यात मिशन कवच कुंडल आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्तानं लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. बारामती तालुक्यात आत्तापर्यंत ७८% नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर ४८% नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. दिवाळीपर्यंत १००% लसीकरण होईल यादृष्टीनं प्रयत्न करावेत असंही पवार यांनी सांगितलं. लसीकरण करुन घेणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सद्यस्थितीत कोविड१९ चा सामना करण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे, तरी लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कळवा इथं आयोजित केलेल्या लस महोत्सवादरम्यान ते काल बोलत होते. या महोत्सवादरम्यान २७०० नागरिकांनी लसीकरण करुन घेतलं.

Exit mobile version