२०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून मान्यता
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने १७ हजार ६९१ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. या सर्व नव्या महाविद्यालयांना केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत मान्यता दिली असल्याचे आरोग्य मंत्रालयानं उत्तरातून कळवले आहे.