जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातलं सहकार्य आणि गुंतवणुकीबाबत प्रधानमंत्र्यांची आज चर्चा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातल्या तज्ञांशी आणि प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी आज संध्याकाळी ६ वाजता दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी हे देखील यावेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाची सुरुवात २०१६ या वर्षी झाली होती. या क्षेत्रातल्या प्रमुख अडचणी आणि भारताशी सहकार्य आणि इथे गुंतवणुकीच्या संधी यावर जागतिक पातळीवरच्या तज्ञांशी चर्चा करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावर्षी या कार्यक्रमाचा विषय स्वच्छ विकास आणि धारणाक्षमतेला प्रोत्साहन असा आहे. भारतात हायड्रोकार्बन, स्वयंपूर्ण ऊर्जा आणि गॅसवर आधारित अर्थव्यवस्था या क्षेत्रात संशोधन आणि उत्पादन वाढवण्याला चालना देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि तज्ञ या बैठकीत आपले विचार मांडणार आहेत.