बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या महापरीनिर्वाण मंदीरात अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी ते बोलत होते. आजही कोणी जेव्हा भारताच्या संसदेत प्रवेश करतो तेव्हा ‘धर्म चक्र प्रवर्तनाय’ या मंत्राकडे त्यांची नजर जातेच, असंही ते म्हणाले. श्रीलंकेहून कुशीनगर आलेल्या पहिल्या विमानानं बौद्ध भिख्कू शिष्टमंडळाचं इथं झालेलं आगमन दोन्ही देशांमधलं अध्यात्मिक संबंध दृढ असल्याचं जिवंत प्रतिक आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण केलं, तर जगाला भेडसावणारा पर्यावरणाच्या समस्येवरही आपण मात करू शकतो, असंही ते म्हणाले.