केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा- दादा भुसे
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा, अशी मागणी, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य शासनाच्या अनुदान रक्कमेपोटीचा ९७३ कोटी रुपये हप्ता, पाच ऑक्टोबरलाच विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला असून, केंद्र शासनाने त्यांच्याकडील ९०० कोटी रुपये हप्ता विमा कंपन्यांना लवकर द्यावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणं शक्य होईल, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.