Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “मिशन युवा स्वास्थ्य” अभियान राबवलं जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ दरम्यान “मिशन युवा स्वास्थ्य” अभियान राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होते. राज्यातल्या महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे, असं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. या अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांचं लसीकरण केलं जाईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version