Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय नौदलाची ६ जहाजे श्रीलंकेच्या चार दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलामधे सामील असलेले सुजाता, मगर, शार्दुल, सुदर्शनी, तरंगिणी आणि तटरक्षक जहाज विक्रम यांचा समावेश आजपासून चालू झालेल्या चार दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण त्यांच्या शंभराव्या आणि एकशे एकाव्या इंटिग्रेटेड ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्ससाठी ओव्हरसीज डिप्लॉयमेंटचा भाग आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश तरुण अधिकारी आणि अधिकारी-प्रशिक्षणार्थींना हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांच्या सामाजिक-राजकीय आणि सागरी पैलूंशी अवगत करुन त्यांच्या कौशल्य क्षितिजे विस्तृत करणे हा आहे. या प्रशिक्षणार्थींना आय. एन युद्धनौकांच्या विविध उत्क्रांतीमध्ये समुद्र आणि बंदराची ओळख करून देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परकीय राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे वाढवावेत याबद्दल माहिती मिळेल. भारतीय नौदल गेल्या चार दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देत आहे

Exit mobile version