अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग – एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणातले पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केला आहे. आर्यनच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम साईल यांनी नोटरीच्या स्वाक्षरीने केलेल्या शपथपत्रात मांडला असून, त्यांचा व्हिडिओ देखील सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असल्याचं, क्षेत्रीय उप-महासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितलं. साईल यांनी हे शपथपत्र सामाजिक माध्यमाऐवजी न्यायालयात सादर करायला पाहिजे होतं, असं ते म्हणाले.