Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा वितरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १२ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात काल ९२५ लसीकरणाच्या माध्यमातून १ लाख १४ हजार २५७ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत ९ कोटी ५२ लाख ७९ हजार ७७० मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.

Exit mobile version