समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई परिश्रेत्र संचालक समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची समिती मुंबईतल्या क्रुझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी वानखेडे करत आहेत. या प्रकरणात चित्रपट अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानही आरोपी आहे. या प्रकरणी वानखेडे यांच्या विरोधात प्रभाकर सईल, एडव्होकेट सुधा द्विवेदी, एडव्होकेट कनिष्क जैन आणि नितिन देशमुख यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याबाबत ही चौकशी समिती नेमली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत या चौकशीचं पर्यवेक्षण करणार असून, उपायुक्त हेमराजसिंग राजपूत चौकशीत त्यांना सहाय्य करतील.