कोविड लसीकरण मोहिमेत देशाने आोलांडला १०४ कोटी मात्रांचा टप्पा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाने १०४ कोटी मात्रांचा टप्पा आोलांडला आहे. आतापर्यंत देशात १०४ कोटी ८ लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ७२ कोटी ५० लाख जणांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून, ३१ कोटी ५७ लाख लोकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. काल ४९ लाख ९ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात काल चार हजार ६८४ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ४ लाख ६२ हजार २०९ नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत ९ कोटी ६७ लाख ४५ हजार ७६० मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.