Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई : दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही  मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

प्रशासनामार्फत  निय‍मितपणे दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी इत्यादी सणांच्या काळात खाद्यतेल, खवा, तयार मिठाई, मिठाईसाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे या अन्नपदार्थांचे उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात. विश्लेषण अहवालात नमूद उल्लघनांनुसार कायद्यातील तरतुदीच्या अनुषांगाने कारवाई केली जाते. अन्न पदार्थांची गुणवत्ता अबाधित रहावी, याकरिता तसेच अन्नपदार्थांच्या भेसळीस आळा बसावा व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

सणासुदीच्या कालावधीत जनजागृती

मिठाई बाबत

नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा

Exit mobile version