अमित शहा यांनी “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा प्रारंभ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा नवी दिल्ली इथं प्रारंभ केला. आरोग्य कार्ड लाभार्थ्यांना देऊन ही योजना चालू करण्यात आली. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक यांनाही आयुष्मान सी.ए.पी.एफ कार्ड दिले. सी.ए.पी.एफ हे असं कार्ड आहे, ज्यामुळे देशातील सुरक्षा गार्ड्सची तसंच त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा घेण्यात येणार असून ही योजना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सुरक्षाकर्मींसाठीही बनवण्यात आली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ३५ लाख कार्ड्सचं वितरण करण्यात येतील, असं ते म्हणाले.