नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
वस्तू आणि सेवा कर परिषदेशी होणारी चर्चात्मक बैठक आणि इतर तज्ञांशी झालेला संवाद याबाबत आयोगाने सल्लागार परिषदेच्या सदस्यांना माहिती दिली.
वस्तू आणि सेवा कर, केंद्र पुरस्कृत योजनांचे सुसूत्रीकरण यांच्याशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सल्लागार परिषदेच्या सदस्यांची याबाबतची मत यावेळी जाणून घेण्यात आली.
आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी परिषदेची पुन्हा बैठक होणार आहे.