अहमदनगर रुग्णालय आग दुर्घटना प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह ४ जण निलंबित तर २ जणांची सेवा समाप्त
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्हा शासकीय रूग्णालयातल्या कोविड अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीच्या प्रकरणात, प्रशासनानं जिल्हा शल्यचिकित्सकासह चार जणांना निलंबित केलं आहे, तर तर दोन परिचारिकांची सेवा समाप्त केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. या कारवाईअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा, डॉक्टर सुरेश ढाकणे, डॉक्टर विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे यांना निलंबित केलं आहे, तर आस्मा शेख आणि चन्ना अनंत या दोन परिचारिकांच्या सेवा समाप्त केल्या आहेत, असं टोपे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.दरम्यान जिल्हा रुग्णालयातल्या परिचारिकांनी या कारवाईला विरोध केला आहे. अग्निशमन यंत्रणा बसवणं हे परिचारिकांचं काम नाही, त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी केली आहे.