नवी दिल्ली : आयुष औषध प्रणालीद्वारे लोकांना आरोग्य सुविधा प्रदान करण्याकडे सरकार विशेष लक्ष पुरवत आहे. देशभरात 12,500 आयुष आरोग्य आणि वेलनेस सेंटर उभारण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
यापैकी 4000 केंद्र यावर्षात उभारली जातील, असे ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात युनानी आरोग्य केंद्र आणि सिद्ध क्लिनिकल संशोधन युनिटचे उद्घाटन करताना ते बोलत होते.