रिझर्व बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांचा गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा दिला आहे. सूक्ष्म अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य या दृष्टीनं क्रिप्टोकरन्सी हे काळजीचं कारण ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं क्रिप्टोकरन्सी संदर्भातील रिझर्व बँकेचे आदेश रद्दबातल ठरवल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरन्सीबाबत उत्साहाचं वातावरण असताना शक्तिकांत दास यांनी हा इशारा दिला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात कायदा करण्याबाबत उद्योगक्षेत्रातले तज्ञ आणि संबधितांशी केंद्र सरकारचा विचार विनिमय सुरू आहे.