मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८ हजार ५३६ वर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८ हजार ५३६ झाली आहे. यापैकी आत्तपर्यंत ७ लाख ३६ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १६ हजार २८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मुंबईचा कोरोना मुक्तीदर ९७ टक्क्यावर स्थीर आहे. सध्या मुंबईभरात सध्या २ हजार ७६१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार १९४ दिवसांवर झाला आहे.