Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वित्त मंत्रालयाकडून १९ राज्यांच्या ग्रामीण तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरोग्य क्षेत्राकरता निधी जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागानं १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार १९ राज्यांच्या ग्रामीण तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरोग्य क्षेत्राकरता ८ हजार ४५३ कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे. याशिवाय आयोगानं २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुमारे ४ लाख २८ हजार कोटी रुपायांचं अनुदान देण्याची शिफारस केली आहे. यात ७० हजार ५१ कोटी रुपयांचं अनुदान आरोग्य क्षेत्रासाठी आहे. चालू आर्थिक वर्षात आरोग्य अनुदानाकरिता १३ हजार १९२ कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता ८ हजार २७३ कोटी रुपये आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता ४ हजार ९१९ कोटी रुपये आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून उर्वरित नऊ राज्यांमधून प्रस्ताव आल्यानंतर आरोग्य अनुदान निधी जारी केला जाईल, असं वित्तमंत्रालयानं म्हटलं आहे.

Exit mobile version