Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियाना अंतर्गत देशानं १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात ५८ लाख ४२ हजाराहून अधिक जणांचं लसीकरण करण्यात आलं. दरम्यान काल ११ हजारापेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १२ हजारापेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २६ शतांश टक्के आहे. दरम्यान देशात सध्या १ लाख ३६ हजारापेक्षा अधिक रुग्ण उपचाराधिन आहेत. गेल्या चोवीस तासात ५५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

Exit mobile version