रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जा रद्द, कोरोनापूर्वीचे तिकीटदरही लागू होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विशेष दर्जा समाप्त करणं आणि महामारीपूर्वीचे तिकीट दर बहाल करण्याचा आदेश रेल्वेनं तात्काळ प्रभावाने जारी केला आहे. रेल्वेगाड्यांची संख्या आता पूर्वीप्रमाणेच नियमित होईल, आणि महामारी पूर्वीचेच तिकीट दर लागू होतील, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर केवळ विशेष गाड्याच रेल्वेद्वारे चालवल्या जात होत्या त्याचे दर अधिक होते. लोकांनी विनाकारण प्रवास करु नये, म्हणून ही व्यवस्था केली होती. लांब पल्ल्याच्या आणि कमी पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विशेष रेल्वेगाड्या म्हणून चालवल्या जात होत्या.