विधापरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : विधापरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष यांनी प्रज्ञा सातव यांच्या नावाला मान्यता दिल्यानंतर काँग्रेसनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज ही माहिती दिली. विधान परिषदेतले काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. प्रज्ञा सातव या माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. या निवडणुकीसाठीची अधिसूचना अधिसूचना जारी झाली असून १६ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भारता येणार आहेत. विधानसभेच्या सदस्यांद्वारे २९ नोव्हेम्बरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानपरिषद पोट निवडणकीसाठी आज भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज विधानभवन इथं दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उपस्थित होते.