Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं ११३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं ११३ कोटी मात्रांचा  टप्पा ओलांडला आहे. यापैकी ३७ कोटी ७६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत, तर ७५ कोटी ६० लाखापेक्षा जास्त नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे. लसीकरण मोहीमेच्या आज ३०५व्या दिवशी दुपारपर्यंत, ४६ लाख ६५ हजारापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. राज्यातही आजच्या दिवशी दुपारपर्यंत ८ हजार ३५१ लसीकरण संत्रांच्या माध्यमातून ४ लाख १४ हजारापेक्षा जास्त लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या लस मात्रांची एकूण संख्या १० कोटी ३७ लाखापेक्षा जास्त झाली आहे. यापैकी ३ कोटी ४१ लाखापेक्षा अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

Exit mobile version