Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रिझर्व्ह बँकेची NBFCला ६ महिन्यात लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व NBFC अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी ६ महिन्यात अंबुड्समनची नियुक्ती करावी असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. १० पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या, ठेवी स्वीकारणाऱ्या NBFC, तसंच ठेवी न स्विकारणाऱ्या पण ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या NBFC ला हे आदेश लागू होतील. अंतर्गत तक्रार व्यवस्थापनात हा अंबुड्समन सर्वोच्च असेल. NBFC नं अंशतः किंवा पूर्ण अमान्य केलेल्या तक्रारींचा आढावा तो घेईल आणि तक्रारदाराला अंतिम निर्णय कळवेल. सर्वसामान्यांना या अंतर्गत त्याच्याकडे थेट कुठलीही तक्रार करता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांशी संबंध येत नसलेल्या NBFC ला अंतर्गत अंबुड्समनची नियुक्ती करण्याची गरज नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.

Exit mobile version