देशात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीकरण पूर्ण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात लसीच्या ६७ लाख ८२ हजाराहून जास्त मात्र देण्यात आल्या. दरम्यान, देशात काल दिवसभरात १० हजाराहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर १२ हजाराहून जास्त जण कोरोनमुक्त होऊन घरी गेले. देशाचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक २८ शतांश टक्क्यांवर पोचले आहे. देशात सध्या १ लाख २८ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीन उपचाराधीन रुग्ण आहे. काल ३०१ जणांनी कोरोना संसर्गामुळे आपला प्राण गमावला.