२०३१ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा आयसीसीचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०३१ मधे पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारत आणि बांगलादेशमधे भरवायचं ठरवलं आहे. यजमानपदाचा निर्णय स्पर्धात्मक बोलीमधून झाला. २०२४ ते २०३१ दरम्यानच्या आय.सी.सी.च्या विविध स्पर्धांबाबत काल एका बैठकीत निर्णय झाले. ११ पूर्णवेळ सदस्यांसह एकूण १४ देशांमधे या स्पर्धा होणार आहेत. बांगला देशने यापूर्वी २०११ मधे श्रीलंकेसोबत विश्वचषक स्पर्धा भरवली असून २०१४ च्या टी-ट्वेंटी विश्वचषक सामन्यांचं आयोजन केलं आहे. यावेळी प्रथमच अमेरिकाही मैदानात उतरली असून २०२४ च्या पुरुष टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडीजला संयुक्तपणे मिळालं आहे.