Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अशासकीय संस्था, नागरी संस्था आणि संबधित घटकांनी पंतप्रधानांच्या ‘ हर घर दस्तक ’ मोहिमेला बळ द्यावं – मनसुख मांडवीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम घरोघरी घेऊन जाण्याच्या कामी स्वयंसेवी संस्था संघटनांचं सहकार्य मिळावं याकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल एका बैठकीचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. देशाच्या कानाकोपऱ्यात लसीकरण अभियान पोचवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. देशातील अशासकीय संस्था, नागरी संस्था आणि संबधित घटकांनी पंतप्रधानांच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेला बळ देण्याचं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. देशभरात कोविड  लसीकरणाची  व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्या विविध सहभागी घटकांशी संवाद साधताना डॉक्टर मांडवीय म्हणाले की, या संस्थांच्या मदतीनं ८० टक्के लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा आणि चाळीस टक्के लोकांना दुसरी मात्रा मिळू शकली.

Exit mobile version